Published On : Sat, Dec 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महापालिकेतील ७० अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

Advertisement

एचडीएफसी बॅकेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

नागपूर : महानगरपालिका नागपूर, एचडीएफसी बॅक आणि अर्पण ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. ९) रोजी नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त श्री राम जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांचे सहकार्य शिबीराला मिळाले.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या उपक्रमाचे हे १४ वर्ष असुन भारतातील ११५० शहरांत असलेल्या ५५०० हुन अधिक केंद्रामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये महानगरपालिकेतील विविध अधिकारी/कर्मचारी यांनी सदर शिबीरामध्ये रक्तदान करुन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबीरामध्ये एकुण ७० अधिकारी / कर्मचारी यांचेमार्फत रक्तदान करण्यात आले. “रक्तदान हे श्रेष्ठदान ” या म्हणीप्रमाणे म.न.पा. नागपूर च्या विविध स्तरावरील लोकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले. एचडीएफसी बँकेतर्फे श्री मेहुल शिर्के, रेणुका आंबेकर व श्री गुरुप्रसाद राव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. ब्लड बँकेतर्फे डॉ. पी. खेडीकर, डॉ. नकुल ठाकरे व श्री अंकित सिंग बैस यांनी रक्तदान शिबीरात सहकार्य केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.