
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेने (NMC) ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:०० पर्यंत पेंच I, II, III व IV WTPचे ३६ तासांसाठी शटडाउन ठेवण्याचे नियोजन केले आहे. हे शटडाउन सदर फळ मार्केटजवळ अमृत ९०० मिमी व्यासाच्या फीडर मेन लाईनवर व्हॉल्व्ह बसविण्याचे कामासाठी आवश्यक आहे.
या शटडाऊनमुळे खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील:
लक्ष्मी नगर झोन:
लक्ष्मी नगर ओल्ड CA, गायत्री नगर CA, प्रताप नगर CA, खामला CA, टाकळी सीम CA, जायताळा CA, त्रिमूर्ती नगर CA, लक्ष्मी नगर न्यू CA
धरमपेठ झोन:
राम नगर ESR CA, राम नगर GSR CA, फुटाळा लाईन, सिव्हिल लाईन्स DT, रायफल लाईन, सेमिनरी हिल्स GSR CA, सेमिनरी हिल्स ESR CA, दाभा CA, टेकडी वाडी CA, IBM DT, GH-बर्डी CA, धंतोली CA
हनुमान नगर झोन:
चिंचभवन CA, ओमकार नगर विद्यमान CA, ओमकार नगर नवीन CA, हुदकेश्वर CA, श्री नगर CA, नालंदा नगर CA, हुदकेश्वर व नरसाळा टॅपिंग, AMRUT डबल डेकर ESRs
धंतोली झोन:
वांजरी नगर ओल्ड CA, वांजरी नगर न्यू CA, रेशीमबाग CA, हनुमान नगर CA
नेहरू नगर झोन:
सक्करदरा १ व २ CA, सक्करदरा ३ CA, AMRUT बिडीपेठ CA, AMRUT बाळाजी नगर CA
गांधीबाग झोन:
सिताबर्डी किल्ला १ CA, सिताबर्डी किल्ला २ CA, किल्ला महाल CA, गोदरेज आनंदम CA, GH-मेडिकल फीडर
सतरंजीपुरा झोन:
बोरियापुरा ESR CA, बोरियापुरा फीडर, सेंट्रल रेल्वे परिसर, वाहन ठिकाणा DT
आशी नगर झोन:
नारा CA, नारी CA, अमृत नारी १ CA, अमृत नारी २ CA, जरीपटका CA, नारा NIT CA
मंगलवारी झोन:
गिट्टीखदान CA, गोरेवाडा GSR CA, अमृत गोरेवाडा ESR CA, GH-राजनगर CA, GH-सदर CA
या पाणीपुरवठा शटडाउनदरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.









