नागपूर: शहरातील अंबाझरी तलावात उडी मारून ६२ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शशिकला देवीदास सोयाम असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या महिलेने ३० जानेवारी २०२५ रोजी अंबाझरी तलावात उडी मारून आपले जीवन संपवले.
ही घटना दुपारी ४ वाजता घडली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला.मृत महिलेचा मुलगा सचिन देवीदास सोयाम याने दिलेल्या जबाबावरून अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची तक्रार दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.