मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 600 किमीचे रस्ते : पालकमंत्री

Advertisement

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 1600 किमीचे रस्ते ग्रामीण भागात होत असून, पालकमंत्री पांदन योजनेत 4000 किमीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. तसेच पंतप्रधान सडक योजनेत 1000 किमी नव्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या जिल्ह्यात आता रस्त्याचे मजबूत जाणे विणले जात असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

शासनाच्या सर्व योजना सावनेर विधानसभा मतदार संघात राबविण्यात येत आहेत. शेवटच्या माणसापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवून त्यांचा विकास करण्याचा या शासनाचा प्रयत्न आहे. सन 2022 पर्यंत या विधानसभा मतदारसंघातील गरीबांचे सर्व कवेलू व टीनाचे घर पक्के झालेले असतील.

Advertisement
Advertisement

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सर्व गरीब माणसांना देण्यात येणार आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या गरीबांना फुकटात पट्टेवाटप करून घरासाठी आर्थिक मदत केली जाणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आणि नगराध्यक्ष स्मृती इखार यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. कळमेश्वरच्या बाजार चौकात झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement