Published On : Fri, Sep 15th, 2023
By Nagpur Today Nagpur News

गुरुवारी 54 पीओपी मूर्ती जप्त

40 हजार रुपये दंड वसूल ; मनपाच्या कारवाईला गती
Advertisement

नागपूर : पीओपी मूर्ती विरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला असून शहरात धडक कारवाईला गती दिली आहे. गुरुवार (ता. 14) विविध भागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 54 पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व या कारवाईमध्ये 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित पीओपी मूर्तीच्या विक्रीवर आळा बसावा यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहिम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांच्याद्वारे संयुक्तरित्या मूर्ती तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाच्या प्रतिनिधींकडून मूर्तीची तपासणी करून ती मातीची अथवा पीओपीची असल्याची शहानिशा केली जाते. पीओपी मूर्ती आढळताच तात्काळ मूर्ती जप्त करून संबंधितांवर 10000 रुपये दंडाची कारवाई केली जाते.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याअंतर्गत गुरुवार (ता.14) हुडकेश्वर रोड, नंदनवन, खरबी चौक, रामेश्वरी रोड या भागातील मूर्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 04 ठिकाणी पीओपी मूर्तींची विक्री होत असल्याचे दिसून आले. या सर्व विक्रेत्यांवर कारवाई करीत एकूण 54 मूर्ती जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी 10000 रुपये याप्रमाणे एकूण 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी श्री. रोहिदास राठोड, श्री. लोकेश बासनवार, उपद्रव शोध पथक सिव्हीलचे श्री. संजय खंडारे, यांच्या चमूने ही धडक कारवाई केली. यावेळी पारंपारिक मुर्तिकार श्री सुरेश पाठक व श्री चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते.

यांच्यावर झाली कारवाई
मे. गणेश मर्ती भंडार, हुडकेश्वर रोड (16 मूर्ती), मे. रोशन मुर्ती भंडार, नंदनवन (17 मूर्ती), मे. गुप्ता मुर्ती भंडार, खरबी चौक (16 मूर्ती), मे. वेदान्त मुर्ती भंडार, रामेश्वरी रोड (5 मूर्ती),

Advertisement
Advertisement