Published On : Thu, Aug 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कामठी येथे 50 वर्षीय व्यक्तीने केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

Advertisement

नागपूर: शहरातील कामठी परीसरात खलासी लाईन येथे एका 50 वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या ८ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदेश धनीराम वासनिक (५०) रा. खलासी लाईन, कामठी हा मंगळवारी रात्री घरी एकटाच होता.

त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय पीडितेला त्याने खाऊ घेऊन देण्याच्या बहाण्याने बोलावले.

मात्र, आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीने रडत घरी जाऊन घडलेला प्रकार आईला सांगितला.आईने मुलीला पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. जुने कामठी पोलिसांनी बीएनएस आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.