नागपूर : शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असणाऱ्या गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा बुधवारी (ता: 31) सत्कार करण्यात आला. संपूर्ण शहरात सेवा देणाऱ्या मनपाच्या ५० गुणवंत सफाई कामगार व ऐवजदार सफाई कामगारांचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात मुख्य स्वचछता अधिकारी श्री. रोहिदास राठोड, वरीष्ठ स्वास्थ निरीक्षक श्री. लोकेश बासनवार, सर्व झोनल अधिकारी, स्वच्छता निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी ३१ जुलै शहीद सफाई सैनिक दिनाचे महत्व विषद केले. ३१ जुलै १९५४ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावर झालेल्या गोळीबारात सफाई कर्मचारी श्री. भूमसिंग हे शहीद झाले. त्यांच्या स्मृतीमध्ये देशभर हा दिवस शहीद सफाई कर्मचारी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ३१ जुलै रोजी गुणवंत स्थायी सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार करण्यात येतो. मनपाद्वारे कोव्हिडचा काळ वगळता दरवर्षी गुणवंत कर्मचा-यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात येते.
नागरिकांचे आरोग्य जपण्याची महत्वाची जबाबदारी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांवर असून प्रत्येक सफाई कर्मचारी करीत असलेल्या कार्यामुळेच शहर स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा याकरिता प्रत्येक महिन्यात झोननिहाय कार्यक्रम घेऊन स्वच्छता दुतांचा सत्कार करण्यात यावा, असे आवाहन उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी झोनल अधिकाऱ्यांना केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. अरुण तुर्केल यांनी केले व तर श्री. राजीव राजूरकर यांनी आभार व्यक्त केले.
*सत्कारमूर्ती गुणवंत सफाई कर्मचारी व ऐवजदार*
– झोन क्रमांक १ लक्ष्मीनगर:
१) श्री शिवराम समुदे
२) श्री. विजय धोंडबाजी घुघुस्कर
३) श्री. राजू मून
४) श्रीमती बबीता मोहन डकाहा
५) श्रीमती शारदा सुभाष बैस
– झोन क्रमांक २ धरमपेठ:
१) श्री. कन्हैया गोवर्धन बक्सरे
२) श्री. अनिल बळीराम बनकर
३) श्री. धनपाल धरमदास भिमटे
४) श्रीमती संजूबाई राजु राजकरोसिया
५) श्रीमती निर्मला मुन्नास्वामी टोटलवार
– झोन क्रमांक ३ हनुमाननगर:
१) श्री. अनूप नैनसिंग कैसरी
२) श्री प्रदिप सुखराम शेंडे
३) श्री. तिलक नथ्थु सातपुते
४ ) श्रीमती उज्वला श्यामकुंवर वासनिक
५) श्रीमती शिला तुलाराम राऊत
– झोन क्रमांक ४ धंतोली:
१) श्री. सुरजीत जिप्सी
२) श्री, बंडु राजाराम मेश्राम
३) श्री. चंद्रमणी नामदेव गजभिये
४) श्रीमती सुनिता सुरेश खरे
५) श्रीमती लिलाबाई पुरूषोत्तम धनविजय
– झोन क्रमांक ५ नेहरुनगर:
१) श्री. श्यामराव कारुजी गेडाम
२) श्री. सिध्दार्थ महादेव मडके
३) श्री. लक्ष्मण आनंदराव पोटपोसे
४) श्रीमती शिला गोपाल रामटेके
५) श्रीमती नंदा गोपाल दहिकर
– झोन क्रमांक ६ गांधीबाग:
१) श्री. अशोक मंगल चौधरी
२) श्री. विठ्ठल नारायण मेश्राम
३) श्री. पांडुरंग हरीभाऊ गडीकर
४) श्रीमती गिता केदारनाथ करिहार
५) श्रीमती सविता अनिल चिमोटे
-झोन क्रमांक ७ सतरंजीपुरा:
१) श्री. राजेंद्र नामदेव धवणे
२) श्री. देवेंद्र हरिदास अंबादे
३) श्री. विकास रामाजी सांगोळे
४) श्रीमती छाया सुंदरलाल शेंद्रे
५) श्रीमती वंदना संजय सोरते
-झोन क्रमांक ८ लकडगंज:
१) श्री. शिवकुमार तातोबा माटे
२) श्री. रविंद्र बाबुलाल भोंडेकर
३) श्री. मोहन गुलाब चव्हाण
४) श्रीमती चंद्रकला देवचंद कोहाड
५) श्रीमती रेखा सुनिल जनवारे
-झोन क्रमांक ९ आसीनगर:
१) श्री. रविंद्र सज्जन रामटेके
२) श्री. राजकुमार कवडु डोंगरे
३) श्री. राजेश दौलत पाटील
४) श्रीमती निर्मला गोपाल वासनिक
५) श्रीमती कविता शंकर समुद्र
-झोन क्रमांक १० मंगळवारी:
२) श्री. अंगत बिंदा बसेला
श्री. सोहनसिंग पन्नालाल घटाटे
३) श्री. हिरेंद्र ब्रिजलाल डागोर
४) श्रीमती उषा अरुण सोनकर
५) श्रीमती सज्जो राजेश डकाहा