Published On : Thu, Sep 19th, 2019

संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत 442 प्रकरणांना मंजुरी

कामठी :-कामठी तहसील कार्यालयात नुकतीच संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक पार पडली.या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्ध्तीने एकूण 458 अर्जदारांनी अर्ज सादर केले होते .बैठकीत झालेल्या अर्जाच्या पडताळणीत 442 अर्ज मंजूर तर 16 अर्ज नामंजूर करण्यात आले तर कुटुंब अर्थसहायय योजनेच्या 19 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जानुसार श्रावणबाळ योजनेचे 288 प्रकरणे आले त्यातील 12 प्रकरणे नामंजूर करीत 276 प्रकरणे मंजूर करण्यात आले तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकूण 170 प्रकरणातून 4 अर्ज नामंजूर करीत 166 प्रकरणे मंजूर करण्यात आले.

Advertisement

ही बैठक संजय गांधी निराधार अनुदान योजना कामठी तालुकाध्यक्ष अनिल निधान यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार उके यांच्या मुख्य उपस्थितीत घेण्यात आली.याप्रसंगी समीतीच्या सदस्यातील रेखा भावे , सुषमा सीलाम, पांडुरंग आंबिलडूके , श्रीकांत शेंदरे, अविनाश हेडाऊ, स्वप्नील फुकटे, निकेश कातुरे, नरेश मोहबे, खेमराज हटवार, आदी उपस्थित होते.

Advertisement

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement