Published On : Sun, Oct 28th, 2018

पारशिवनी तालुक्यांतर्गत नवमतदार नोंदणी अंतर्गत ४३९३ अर्ज

Advertisement

कन्हान : – राज्यात मतदार नोंदणी मोहीमेअंतर्गत विशेष नाव नोंदणी अभियानांतर्गत पारशिवनी तालुक्यांतर्गत ४३९३ नवमतदारांनी लाभ घेतला असल्याचे तहसीलदार वरुण सहारे यांनी सांगितले.

राज्यात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमांतर्गत नावनोंदणी, वगळणी तसेच नावात बदल इत्यादी संबंधी नमुना ६, ७, ८, व ८ अ अंतर्गत मतदारांची कामे मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मार्फत करण्यात आली. या मोहिमेत नमुना ६ चे शनिवार (ता २७) पर्यंत ३२४७ अर्ज प्राप्त झाले होते. आज विशेष मोहीमेच्या अंतिम टप्प्यात १५४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मार्फत ११४६ नाव नोंदणी साठी अर्ज प्राप्त झाले.

Advertisement

एकंदरीत संपूर्ण मोहीमअंतर्गत ४३९३ अर्ज प्राप्त झाले असल्याचे तहसीलदार वरुण सहारे यांनी सांगितले. या मतदार नोंदणीत नायब तहसीलदार श्री प्रेमकुमार आडे, श्री चव्हाण, पटवारी श्री पोतदार, कोतवाल बंडू वानखेडे यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी खिमेश बढिये, भिमराव शिंदेमेश्राम, मनिषा बेले, प्रेमचंद राठोड, गणेश खोब्रागडे, मधुमती मडावी, गणेश चिंचुलकर, किशोर जिभकाटे, सरपंच बलवंत पडोळे, ग्रामपंचायत सदस्य बैसाखू जनबंधू, शिवाजी चकोले, राहूल टेकाम, मुकुंद उंबजकर यांनी सहकार्य करुन मोहीम यशस्वी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement