Published On : Tue, Sep 28th, 2021
By Nagpur Today Nagpur News

विशेष मोहिमेत ३७ लाखांची वीज चोरी उघडकीस

Advertisement

-दंड न भरल्यास पोलिस कारवाई

नागपूर: महावितरणच्या विशेष पथकाव्दारे वीज चोरी करणाèयाविरुद्ध तपासणी मोहीम राबविण्यात आली. चार दिवसीय तपासणी मोहिमेत ९८ ग्राहकांकडील सुमारे ३६ लाख ९७ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आली. दंडासह वीज बिलाची रक्कम न भरणाèया ग्राहकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

महावितरणने नागपूर शहरातील गांधीबाग, सिव्हिल लाईन आणि महाल विभागात वीज चोरीच्या विरोधात मागील २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविली. नागपूर शहर मंडळ, नागपूर ग्रामीण मंडळ, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या भागातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचाèयांचा समावेश असलेल्या पथकांद्वारे ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २५० पेक्षा अधिक वीज ग्राहकांच्या मीटर व वीज यंत्रणेची तपासणी करण्यात आली.

या तपासणी मोहिमेदरम्यान मीटर मध्ये छेडछाड किंवा आकडे टाकून विजेचा अवैध वापर करणारे ९४ ग्राहक आढळून आले. त्यांच्या कडील युनिटची तपासणी केली असता ही वीज चोरी एकूण ३६ लाख ९७ हजाराची असल्याचे आढळून आले. या ग्राहकांच्या विरोधात विद्युत कायदा कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच त्यांना वीज चोरीच्या दंडासह वीज बिल देण्यात आले आहे. या ग्राहकांपैकी ५ ग्राहकांनी त्वरित १ लाख २५ हजार रुपयांचा रुपयांचा भरणा केला आहे. अन्य पद्धतीने वीज चोरी करणारे ४ ग्राहक आढळून आले. त्यांच्याकडील वीज चोरीची एकूण रक्कम १ लाख ७ हजार रुपये एवढी होती. या ग्राहकांवर विद्युत कायदा कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली आहे. वीज चोरीच्या दोनही प्रकरणात ग्राहकांकडून दंडात्मक रकमेसह वीज बिल वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

वीज ग्राहकांना सवलतीच्या दरात अखंडित सेवा देणाèया महावितरणची अवस्था थकबाकीमुळे अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलांचा नियमित भरणा करावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.