Published On : Mon, Sep 25th, 2017

३३ रुपये लिटरचे पेट्रोल रु. ८० का?


नागपुर:
जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या किमती १/३ झाल्यात. जे कच्च तेल चार वर्षापूर्वी १४० डॉलर प्रती बँरल पर्यंत होत, ते मागील दोन वर्षात अगदी खालच्या पातळीवर आले आहे. आज याची किमंत प्रती बँरल ५० डॉलर आहे. दीड वर्षापूर्वी तर हे प्रती बँरल ३० डॉलर वर आले होते.

मोदी सरकार कडून पेट्रोलियम पदार्थाचे भाव आम्ही खुले केलेत, त्यावरील नियंत्रण हटविल्याची घोषणा केली. सहा महिन्यापासून दररोज भाव कमी जास्त केले जात आहेत, म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव कमी जास्त झाल्यास देशात सुद्धा भाव कमी जास्त करण्याची नीती सरकार कडून स्वीकारली आहे. ही फार चांगली बाब आहे. परंतु आज संपूर्ण जगात जेंव्हा कच्चा तेलाच्या कीमती खाली आल्या आहेत त्या प्रमाणात देशात सुद्धा भाव कमी व्हायला पाहिजेत, मात्र हे न होता दिवसेंदिवस भाव वाढविल्या जात आहेत आणि नागरिकांची फार मोठ्या प्रमाणता लूट केली आज आहे. नुकत्याच FORBES च्या अहवालानुसार भारत भ्रष्ट्राचाराच्या बाबतीत एसीयातील एक नंबरवर असलेल्या देश आहे.

आजच्या आंतरराष्ट्रीय किंमती प्रमाणे भारत देशात GST सह पेट्रोल रु. ४०/- प्रती लिटर तर डीझेल रु. ३५/- प्रती लिटर मिळायला पाहिजे. देशात येणारे पेट्रोल केवळ २७.३०/- पडते म्हणजेच २८/- रुपये लिटर चे पेट्रोल रु ८०/- विकून सरकार एका लिटर मागे रु. ५८/- वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून घेवून नागरिकांची सरेआम लूट करीत आहे. गैस, सिलेंडर रु. ३००/- पडते ते ६५० ला विकत आहे.

ज्या बीजेपीला सत्तेवर येण्याआधी आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत प्रती बँरल ११० डॉलर पेक्षा जास्त भाव असतांना देशात रु.७०/- प्रती लिटर पेट्रोल आणि रु ४५/- प्रती लिटर डीझेल चालत नव्हते, महाग वाटत होते, तेव्हाच्या सरकार विरोधात आंदोलन करीत होते, त्यांना आता सत्तेवर आल्यानंतर अडीच पट ( १४० %) जास्त भावाने विक्री करतांना कसा आनंद मिळत आहे, हेच कळत नाही. जास्ती प्रमाणात असलेले टैक्स जनतेला कळू नायेत म्हणून पेट्रोल, डीझेल, गॅस चे बिल एकूण किमतीचे दिले जाते. परंतु त्याची वास्तविक किंमत + कर किती आहेत ते बिलात वेगवेगळ्या नमूद केल्या जात नाही. यावरून सरकारची नियत कळून येते.

ही लूट करता यावी, दररोज हजारो करोड लुटता यावेत, म्हणून एक देश एक कर (GST) लागू केल्यानंतर सुद्धा पेट्रोलियम पदार्थ GST च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेत. जर आज पेट्रोलियम पदार्थ जास्तीत जास्त २८% GST लावला तरी आम्हाला पेट्रोल रु ४०/- आणि डीझेल रु. ३५ प्रती लिटर मिळायलाच पाहिजे. बाजूच्या छोट्या छोट्या देशात पेट्रोल व डीझेल चे भाव आमच्या देशाच्या निम्म आहेत. एवढेच नव्हेतर नेपाल, भूतान सारखे जे छोटे देश भारताकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी करतात त्या देशात सुद्धा पेट्रोल, डीझेल चे भाव कमी आहेत.

पेट्रोल आणि डीझेल चे भाव जास्त असल्यामुळे देशात सर्वच जीवनावश्यक वस्तू महागड्या मिळत आहेत. अगदी भाजील्यापासून, धान्य, कपडा, वाहतूक आणि प्रवास इत्यादी सर्वच महागाईचा सम्बंध पेट्रोलियम पदार्थांच्या भाव वाढीशी निगडीत आहे.

देशात नोटबंधी पासून उद्दोग बंद पडलेत, लोकांचे रोजगार गेलेत, शेतमालाचे भाव पडलेत, बाजारात मंदी आली आहे. गोरगरीबांपासून तर मध्यम वर्गीय, व्यापारी वर्ग यांना दैनदिन जीवन जगणे कठीण झाले असतांना सरकारी लूट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

ज्या देशात सामान्य लोकांना पसेंजर किंवा जलद गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही, कोणत्याही सुविधा नाहीत, पाहिजे त्या प्रमाणात गाड्या सोडल्या जात नाहीत त्या देशात बुलेट ट्रेनच्या नावावर पुन्हा जनतेची लूट करणे योग्य नाही, एक बुलेट ट्रेन चालविल्या पेक्षा संपूर्ण देशात तेवढा रक्कमेत रेल्वे ट्रॅक चांगले करून जलद नवीन गाड्या चालवायला पाहिजेत. परंतु एकंदरीत बीजेपी सरकार सामान्य नागरिकांच्या हिताचे कोणतेही नर्णय न घेता बड्या उद्योग घराण्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्यामुळे आम आदमी पार्टी या नीतीचा आणि पेट्रोलियम पदार्थातून होणाऱ्या लुटीचा विरोध आणि निषेद करीत आहे.

हा निषेद नोंदविण्यासाठी जनहितार्थ आम आदमी पार्टी संपूर्ण देशात पेट्रोल, डीझेल, गँस च्या माध्यमातून होणारी लूट थांबावी या साठी देशव्यापी आंदोलन करीत आहे.

याकरिता आज नागपूर शहरात कॉटन मार्केट चौकात धरणा प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सहभाग घेवून सरकार च्या जनविरोधी नीतीचा, धोरणांचा नारेबाजी करून विरोध नोंदविला.

आजच्या निषेध कार्यक्रमात देवेंद्र वानखडे, अशोक मिश्रा, जगजीत सिंग, अंबरीश सावरकर, दीपक कटीयारमल, सुनील केलवाडे, अविराज थूल, अफसर खान, निलेश गोयल, शशिकांत रायपुरे, प्रमोद नाईक, संतोष वैद्य, शिरीष तिडके, सोनू ठाकूर, जितेंद्र मुटकुरे, मनीष गिरडकर, नितीन चोपडे, ए.जी सोलंकी, एम.झेड. काझी, प्रभात अग्रवाल, ईश्वर गजबे, प्रशांत निलटकर, अमित बडवाईक, अजय धर्मे, कविता सिंघल, गीता कुहीकर, शालिनी अरोरा, सुभद्रा यादव, सुनंदा खैरकर, सतविंदर सिंग, नरेंद्र कोल्हे, धीरज आगाशे, किरण विल्लोर, राकेश दवे, संजय जीवतोडे, आतिष तायवाडे, वी.बी. पुरेकर, प्रमोद किन्नाके, विकास धर्डे, आदि कार्यकर्ते व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.