Published On : Wed, Apr 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात सोलर पॅनलच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेची 3 लाखांची फसवणूक; वर्ध्यातील आरोपीवर गुन्हा

Advertisement

नागपूर : सोलर पॅनल बसवून देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ महिलेची तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नंदनवन परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात वर्ध्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा रामदास गजभिये (वय ७०), रा. न्यू डायमंड नगर, नंदनवन यांनी त्यांच्या घरावर सोलर पॉवर सिस्टिम बसवण्यासाठी वर्ध्यातील दर्शन रवींद्र सिरसोडे (वय ३३) याच्याशी संपर्क साधला होता. आरोपीने विश्वास संपादन करून सोलर प्लांट बसवून देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, १ मे २०२५ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत आरोपीने टप्प्याटप्प्याने गजभिये यांच्याकडून एकूण ३ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेतल्यानंतरही सोलर सिस्टिम बसवली नाही आणि रक्कम परतही केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे आणि प्राथमिक चौकशीनंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश डाळवी करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.