Published On : Wed, Oct 7th, 2020

कोविड उपाययोजनांसाठी भंडारा जिल्हयास 3 कोटी 49 लाखाचा निधी मंजूर

Advertisement

– कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – वडेट्टीवार

भंडारा : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे.याच धर्तीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर व अमरावती विभागाला 61 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यात भंडारा जिल्हयासाठी 3 कोटी 49 लाख 84 हजार रूपये निधी मंजूर केला आहे.

Advertisement

नागपूरसाठी 13 कोटी 22 लक्ष 2 हजार रुपये, वर्धा 3 कोटी 74 लक्ष 15 हजार, भंडारा 3 कोटी 49 लक्ष 84 हजार , गोंदिया 4 कोटी 03 लक्ष 32 हजार, चंद्रपूर 4 कोटी 45 लक्ष 14 हजार, गडचिरोली 7 कोटी 61 लक्ष 08 हजार असे एकूण नागपूर विभागासाठी 36 कोटी 55 लक्ष 55 हजार इतका निधी मंजूर झाला आहे. नागपूर व अमरावती विभागाला कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी एकूण 61 कोटी 32 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो बीम्स प्रणालीवर आधारित आहे.

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावतीसाठी 14 कोटी 34 लक्ष 89 हजार रुपये, यवतमाळ 5 कोटी 16 लक्ष 72 हजार रुपये, बुलढाणा 3 कोटी 27 लक्ष 16 हजार रुपये, वाशिम 1 कोटी 98 लक्ष 38 हजार रुपये, असा एकूण अमरावती विभागासाठी 24 कोटी 77 लक्ष 15 हजार इतका निधी मंजूर झाला आहे.

कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी आतापर्यंत एकूण 485 कोटी 13 लक्ष इतका निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात आला असून नागपूर 48 कोटी रुपये, अमरावती 22 कोटी 61 लक्ष रुपये, औरंगाबाद 52 कोटी 50 लक्ष रुपये, नाशिक 18 कोटी 70 लक्ष रुपये, पुणे 103 कोटी रुपये, कोकण 235 कोटी 28 लक्ष रुपये, सार्वजनिक आरोग्य विभाग 5 कोटी 4 लक्ष रुपये असे विभागीय आयुक्तांमार्फत आतापर्यंत कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकूण 485.13 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तरी येणाऱ्या काळात कोविडला हद्दपार करण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक असतील त्या शासन स्तरावर तत्परतेने राबविल्या जातील यासाठी निधीची कमतरता पडू देणार असा विश्वास श्री.वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement