मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर काही महिन्यांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. तपासानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगनेच सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचे समोर आले. सलमानला जीवेमारण्याच्या हेतूने हा कट रचण्यात आला होता.
पनवेल पोलिसांच्या दाव्यानुसार या गँगचे तब्बल 350 पानांचे दोषारोपपत्र आहे. त्यामध्ये सलमान खानला मारण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच त्यांचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल, वॉट्सअप कॉल, ग्रुप, टॉवर लोकेशन. त्याआधारे 350 पानांचा आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने पाकिस्तानातून AK-47 रायफल मागवल्या होत्या. पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या पत्रात पनवेल पोलिसांनी असे अनेक दोषारोप पत्र दाखल केले आहे. सलमान खानला सिद्धु मुसेवाला यांच्या प्रमाणेच मारण्याची तयारी करण्यात आली. शुटिंगदरम्यान अथवा पनवेल फार्महाऊसवर सलमान खानला मारण्याची तयारी करण्यात आली होती.