Published On : Mon, Nov 2nd, 2020

२४ तासांचे कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाऊन आता ४ नोव्हेंबर (बुधवार) रोजी

Advertisement

#लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…

नागपूर,: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे नादुरुस्त फ्लो मीटर बदलणे तसेच, कन्हान ९०० मिमी फीडरवरील कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील गळती दुरुस्ती, लकडगंज जलकुंभ परिसरात बायपास लाईनवरील गळतीची दुरुस्ती व इतर कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे देखभाल आणि दुरुस्ती चे महत्वाची कामे करण्यासाठी आता ४ नोव्हेंबर २०२० (बुधवार) सकाळी ११ ते ५ नोव्हेंबर २०२० (गुरुवार) सकाळी ११ दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

Gold Rate
June 12 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 48,200 /-
Gold 22 KT ₹ 1,37,400 /-
Silver/Kg ₹ 2,41,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा २४ तासांचा शटडाऊन आधी २ तारखेला घेण्याचे ठरले होते पण १ तारखेला कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे वारंवार वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे आणि त्यामुळे रविवारी लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने, ह्या भागातील नागरिकाना त्रास होऊ नये म्हणून आता ४ नोव्हेंबर २०२० (बुधवार) सकाळी ११ ते ५ नोव्हेंबर २०२० (गुरुवार) सकाळी ११ दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

या दरम्यान या कामांमुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.या शटडाऊन काळात खालील कामे प्रस्तावित आहेत:

१. केंद्राच्या कच्च्या पाण्याच्या इनलेटवर फ्लो मीटर बसविणे

२. कलमना जलकुंभ परिसरात ७००मिमी फीडर मेनवर २ एंड प्लेट बसविणे व नागोबा मंदिरजवळ व्हॉल्व बसविणे.

३. कन्हान ९०० मिमी फीडरवरील कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील गळती दुरुस्ती

४. लकडगंज जलकुंभ परिसरात बायपास लाईनवरील गळतीची दुरुस्ती

५. लकडगंज जलकुंभाच्या ब्रांच फीडर व्हॉल्व ची प्रतिबंधात्मक देखभाल

या कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा ४ नोव्हेंबर (बुधवार) सकाळी ११ ते ५ नोव्हेंबर (गुरुवार) सकाळी ११ दरम्यान बाधित राहील:

आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान जवळपास लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने का दावा #nagpurnews #LatestNews

सतीश उके ने मामलों पर उठाए सवाल; दबाव में शिकायत दर्ज कराने...

दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews

दो दुष्कर्म मामलों से शहर मै मची सनसनी #nagpurnews #crime #latestnews

गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime  #nagpurnews #maharashtranews

गिट्टी खदान में हथियारों के जखीरे का भंडाफोड़ ...#latestnews #crime #nagpurnews #maharashtranews

नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate #nagpurnews #maharashtranews

नई पानी की टंकी में नहा रहे नाबालिग बच्चे ... #latestnews #newsupdate...

डॉ. राजीव पोतदार ने जीत का दावा किया.. #nagpurnews #bjp #politicsnews

डॉ. राजीव पोतदार ने जीत का दावा किया.. #nagpurnews #bjp #politicsnews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges