Published On : Mon, Jul 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पावसाळी तक्रारींवर मनपाद्वारे कार्यवाही २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

Advertisement

नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात समस्या निर्माण झालेल्या आहेत. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सातत्याने बचाव कार्य सुरू असून या कार्याद्वारे शहरातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न मनपातर्फे सुरू आहे.

पावसामुळे शुक्रवारी १५ जुलै रोजी धरमपेठ झोनमधील हिस्लॉप कॉलेज ते राजा राणी चौक आणि मरियम नगर भवन्स शाळेजवळ झाड पडल्याची घटना घडली. यावर मनपाच्या पथकाद्वारे तात्काळ कार्यवाही करीत रस्ता मोकळा केला. लकडगंज झोनमधील एच.बी. टाउन चौक, कळमना रोड हॉस्पीटल जवळ, कळमना गौरी नगर भरतवाडा वस्तीमध्ये आणि गि-हे लेआउट गोधणी येथे पाणी जमा झाल्याची तक्रार प्राप्त झाली यावरही झोन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. याशिवाय पृथ्वीराज हॉटेल समोर संत्रा मार्केट चौक नागोबा मंदिराजवळ घरातील बाल्कनी पडल्याची तक्रार प्राप्त होताच यावबाबतही कार्यवाही करून दिलासा मिळवून देण्यात आला. खामला रोड पराते हॉल आणि सीताबर्डी येथील व्हेरॉयटी चौक ते झिरो मॉईल या मार्गवरील खड्डे बुजवण्याचेही काम मनपातर्फे करण्यात आले.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शनिवारी १६ जुलै रोजी आशीनगर झोनमधील कवठा लावडी तलाव धरण फुटल्याने उप्पलवाडी येथील मनपा एस.आर.ए. बिल्डींग येथे पाणी वाहत असल्याची तक्रार प्राप्त झाली. तर लक्ष्मीनगर झोनमधील हिंगणा टि पॉईंट कर्णकुटी रेस्टॉरेंट जवळ पाणी जमा झाल्याची तक्रार मिळाली. हनुमान नगर झोन मधील राधानगर सत्यसाई कॉन्व्हेंटजवळ पाणी जमा झाले. या सर्व तक्रारींवर प्राधान्याने कार्यवाही करीत तातडीने दिलासा मिळवून देण्यात आला. गांधीबाग झोनमधील राम कुलर्स शिवाजी पुतळा भवन जवळ घरावर झाड पडल्याची तक्रार प्राप्त होताच पथकाद्वारे तात्काळ कार्यवाही करून रस्ता मोकळा करण्यात आला.

रविवारी १७ जुलै रोजी धरमपेठ झोनमधील मेडिट्रीना हॉस्पीटलच्या मागील भागात रस्त्यावर झाड पडले, मंगळवारी झोन अंतर्गत पागलखाना चौक इंडियन ब्रायलर फार्मच्या बाजुला सुद्धा रोडवर झाड पडल्याची तक्रार प्राप्त झाली. यावर अग्निशमन पथकाद्वारे तात्काळ कार्यवाही करीत रस्ता मोकळा करण्यात आला. लक्ष्मीनगर झोन मधील हिंगणा टि पॉईंट जवळ जमा असलेले पाणी काढण्याबाबत अग्निशमन पथकाद्वारे कार्यवाही करण्यात आली. सतरंजीपूरा झोन अंतर्गत जुना भंडारा रोड, इतवारी जगदीश मिष्ठान भंडार हनुमान मंदिर जवळ जमिन खचल्याची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने जलद गतीने बचावात्मक कार्यवाही केली.

Advertisement
Advertisement