Advertisement
मुंबई: भिवंडी शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोनू शहा आणि अस्लम शहा अशी या दोन्ही नराधमांची नावे आहेत.
आरोपी मोनू याने 15 वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला नेले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेची समजूत काढण्यासाठी निकाह केल्याचा बनाव करून मोनूने तिला घरी आणले. त्यानंतर पीडितेवर तिचा मोठा दीर अस्लम यानेही बळजबरीने बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी बेदम मारहाण करून अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवून देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला.