Published On : Thu, Jun 3rd, 2021

मोठी बातमी…उद्यापासून 18 जिल्हे होणार ‘अनलॉक’

Advertisement

मुंबई, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या जिल्ह्यांचा आहे समावेश
पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.

Gold Rate
Feb 13 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,800 /-
Gold 22 KT ₹ 1,44,000 /-
Silver/Kg ₹ 2,48,800 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काय होणार सुरू
रेस्टॉरंट, मॉल्स गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील चित्रपट शुटींगला परवानगी थिएटर सुरू होतील सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे ई कॉमर्स सुरू राहिल जिम, सलून सुरू राहणार पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही बस 100 टक्के क्षमतेने आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील

पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ

दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार

तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर

चौथ्या टप्प्यातील 2 जिल्हे
पुणे, रायगड

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement