Published On : Sun, Sep 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर येथे १७ वा नवरात्र उत्सव “पारिवारिक रास गरबा” 

रेडिओ चॅनेल मधील नामांकित रेडिओ जॉकी “रास गरबा” चे विशेष आकर्षण

नागपूर: जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर , गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने व उत्साहाने “नवरात्री उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने साजरा करीत आहे.
 
ह्यावर्षी दुर्गा मातेच्या आशीर्वादाने “चला रास गरबा ” खेळू या असे म्हणत…टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, राणाप्रताप नगर, पांडुरंग गावडे ले आउट, रवींद्र नगर , सेंट्रल एक्ससाईझ कॉलोनी येथील नागरिकांनी १७ व्या वर्षीचा “नवरात्र उत्सव”  २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत टेलिकॉम नगर येथील हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणात आयोजित करण्यात  आला आहे.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

२६ सप्टेंबर ला घटस्थापनेच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता महिषासुर मर्दिनी दुर्गा देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक तसेच भवानी ढोल-ताशा संपूर्ण महिला वादक पथक ह्यांच्या नाद-वादनात भव्य आगमन आणि त्यानंतर विधिवत स्थापना होणार आहे.

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत दररोज संध्याकाळी ७.३० वाजता देवीची महाआरती होणार आहे.  सप्टेंबर २७ ला सुगम संगीत, सप्टेंबर २८ ला आनंद मेळावा, सप्टेंबर २९ ला सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा  तसेच ऑक्टोबर २ ला सकाळी लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत .
 
सप्टेंबर ३० ते ऑक्टोबर ३ दररोज रात्री ८ वाजता “पारिवारिक रास गरबा” चे आयोजन करण्यात आलेले आहे. नागपूर शहरातील रेडिओ चॅनेल मधील नामांकित रेडिओ जॉकी निशा (Radio Big FM), विपाली (Radio Red FM), तसेच राजन (Radio My FM), अभिषेक (Radio City), फरहान (Radio Mirchi) आणि लोकमत डिजिटल मीडिया हेड सुरभी शिरपुरकर हे विशेष आकर्षण असणार आहेत. ऑक्टोबर ४ ला नवमी महापूजा, महाआरती आणि महाप्रसाद ह्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
“रास गरबा” तसेच इतर  सर्व कार्यक्रमात उपस्थित राहून ह्या नवरात्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जय दुर्गा उत्सव मंडळ कार्यकारिणी तर्फे सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.     

   

Advertisement