Published On : Mon, Sep 21st, 2020

केवळ १५ दिवसात कोळशाच्या १७ हजार वाघिणी

– वीज उत्पादनासाठी २९८ रॅक, ८४ कोटींचा महसूल, मध्य रेल्वेची विक्रमी कोळसा वाहतूक

नागपूर– वीज उत्पादनासाठी एक दोन ट्रक नव्हे तर शेकडो ट्रक कोळसा लागतो. पर्यावरण, प्रदूषण, सुरक्षितता, सुलभता आणि वेळेचे महत्त्व लक्षात घेता रस्ते मार्गाने कोळसा पुरवठा करणे शक्य नाही. संपूर्ण बाबींचा विचार करता रेल्वे हा एकमेव मार्ग सुरक्षित ठरतो. मात्र रेल्वे मार्गाने अर्थात मालगाडीने कोळसा पाठविताना बèयाच बाबींचा विचार करावा लागतो. अलिकडे कोरोनाच्या पृष्ठभूमीवर देशभरात टाळेबंदी तर दुसरीकडे आर्थिक मंदी असतानाही मध्य रेल्वे नागपूर विभागाने केवळ १५ दिवसात १७ हजार २८४ वाघिणीद्वारे कोळसा पुरवठा केला. वेळेच्या आत कोळशाच्या रॅक पोहोचविता आल्याने कुठल्याही व्यत्ययाशिवाय वीज उत्पादन होत आहे.

Advertisement

नागपूर विभागात उमरेड, घुग्घुस, वणी आणि बल्लारशा या चार ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत. कोळसा खाणीपासून ते मुख्य रेल्वे मार्गापर्यंत कॉड रेल्वे मार्ग आहेत. ठरलेल्या वजनाप्रमाणे (टन) कोळसा भरलेल्या वाघिणी एक एक करीत मुख्य मार्गावर लागतात. यानंतर राज्यातील कोराडी, चंद्रपूर, नाशिक, पारस, भुसावळ, परळी वैजनाथ आदी वीज उत्पादन केंद्रांवर पाठविल्या जातात. टाळेबंदी असतानाही मालगाडी आणि पार्सल सेवा सुरू होती.

या माध्यमातून देशाच्या कानाकोपèयात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे वीज उत्पादानासाठी रेल्वेची महत्त्वाची भूमिका राहिली.
एका रॅकमध्ये ५८ वॅगन असतात. याप्रमाणे २९८ रॅकमध्ये १७ हजार २८४ वॅगनद्वारे कोळसा पुरवठा करण्यात आला. मध्य रेल्वे नागपूर विभागाने १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान म्हणजे केवळ १५ दिवसात २९८ रॅक कोळसा लोड करून वीज केंद्रांवर पाठविला. यापासून रेल्वेला ८४ कोटींचा महसूल मिळाला. विशेष म्हणजे मागच्या वर्षी याच काळात रेल्वेने १६२ रॅक लोड करून ४९ कोटींचा महसूल मिळविला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्क्याने अधिक कोळसा पाठविण्यात आणि महसूल मिळविण्यात रेल्वेला यश मिळाले आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी योग्य योजना आखल्यामुळे टाळेबंदी आणि आर्थिक मंदीतही रेल्वेला मोठ्या प्रमाणात रॅक पाठविता आल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कोळशाची विक्रमी वाहतूक करता आली. पुढे याहीपेक्षा अधिक कोळसा आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी नागपूर विभाग सज्ज आहे. सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात विभागीय अधिकारी आणि कर्मचाèयांच्या परिश्रमामुळे सुरक्षित वाहतूक करता आली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement