Published On : Thu, Nov 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 170 प्रकरणांची नोंद

Advertisement

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (9) रोजी शोध पथकाने 170 प्रकरणांची नोंद करून 94700 रुपयाचा दंड वसूल केला.

Gold Rate
June 24 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,600 /-
Gold 22 KT ₹ 1,33,300 /-
Silver/Kg ₹ 2,23,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 4 प्रकरणांची नोंद करून रु 800 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु ४०० प्रमाणे दंड लावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यांवर 2 प्रकरणांची नोंद करुन रु 1000 रुपयांचा दंड वसुल केला.

Advertisement

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 43 प्रकरणांची नोंद करून 17200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 35 प्रकरणांची नोंद करून 3500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु 4400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे (मनपाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करुन रु 37000 दंड वसूल करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर 48 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 9600 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 18 प्रकरणांमध्ये 18000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करुन रु 200 दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख श्री संजय खंडारे, धरमपेठ झोनचे श्री. धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे श्री. पवन डोंगरे, धंतोली झोनचे श्री. नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे श्री. नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे श्री. सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे श्री. प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे श्री. सुधीर सुडके, आशीनगर झोनचे श्री. संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे श्री. नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

🏆 BEST OF NAGPUR 2026
Which School Ranked #1?
Explore Rankings →

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

फर्जी पत्रकार बनकर व्यापारी को धमकाने का आरोप #nagpurnews #crime #journalist #latestnews #news

फर्जी पत्रकार बनकर व्यापारी को धमकाने का आरोप #nagpurnews #crime #journalist #latestnews...

नागपुर में एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की कार्रवाई.. #nagpurnews #crime #tasker #drugs

नागपुर में एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की कार्रवाई.. #nagpurnews #crime #tasker...

नागपुर को मिला नया पुलिस कमिश्नर.. #nagpurnews #policecommissoner #vishwasnangrepatil #breakingnews

नागपुर को मिला नया पुलिस कमिश्नर.. #nagpurnews #policecommissoner #vishwasnangrepatil #breakingnews

SEHAT KI BAAT   Dr Samir Patil EPISODE 6

SEHAT KI BAAT Dr Samir Patil EPISODE 6

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges