Published On : Thu, Jan 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 1612 कोटींच्या निधीचा आराखडा सादर तर शासन मर्यादा केवळ 509 कोटींच्याच निधीची !

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी ठराविक निधीचा आराखडा तयार केला जातो. यंदाच्या वर्षीही हा आराखडा सादर करावा लागणार आहे. हे पाहता जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष 2025-26 साठी 1616 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. याबाबतच्या मागणीचा आराखडा विविध विभागांनी नियोजन विभागाला सादर केला आहे. 1 फेब्रुवारी रोजी ‘डीपीसी’ची बैठक होणार असून, यात हा आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. जानेवारीत महिन्यात ‘डीपीसी’ची बैठक होते; परंतु पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यास सरकारला बराच विलंब झाल्याने जानेवारीत बैठक झाली नाही.

अखेर ही बैठक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवनात होणार आहे. यात वर्ष 2025-26 साठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत १६१२ कोटी रुपयांच्या मागणीचा आराखडा सादर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून जिल्ह्याला वर्ष 2024-25 साठी 944 कोटींचा निधी मंजूर झाला. परंतु अद्याप सर्व निधी मिळाला नसून अनेक विभागांकडून निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे निधीचे पुनर्नियोजन करावे लागणार असून, ‘डीपीसी’च्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

Gold Rate
06 June 2025
Gold 24 KT 98,000/-
Gold 22 KT 91,100/-
Silver/Kg 1,06,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या व मानव विकास निर्देशांक या तीन मुद्द्यांच्या आधारे शासनाकडून ‘डीपीसी’ची निधी मर्यादा निश्चित करण्यात येते. त्यानुसार शासनाने वर्ष 2025-26 साठी 509 कोटींची मर्यादा दिली आहे. परंतु प्रशासनाकडून 1612 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

वित्त व नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेत येत्या 3 फेब्रुवारीला राज्यस्तरीय बैठक होणार आहे.
नागपूर विभागाशी संबंधित सहा जिल्ह्यांच्या निधीसंदर्भात यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement