Published On : Fri, Oct 9th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 153 रुग्णांना डिस्चार्ज

Advertisement

106 कोरोना पॉझिटिव्ह
बरे झालेले रुग्ण 4986
पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 6590
क्रियाशील रुग्ण 1449
आज 02 मृत्यू
एकूण मृत्यू 155
ग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के

भंडारा : जिल्ह्यात आज 153 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4986 झाली असून आज 106 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6590 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के आहे.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज 873 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 52 हजार 460 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6590 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 39, साकोली 04, लाखांदूर 00, तुमसर 19, मोहाडी 13, पवनी 28 व लाखनी तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 4980 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6590 झाली असून 1449 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 155 झाली आहे.

Advertisement

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 3357, साकोली – 524, लाखांदुर- 299, तुमसर- 563, मोहाडी- 605, पवनी- 651 व लाखनी- 591 असे एकूण 6590 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 4986 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.35 टक्के एवढा आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.