Published On : Wed, Oct 31st, 2018

वीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर- ऊर्जामंत्र्यांनी केली घोषणा

नागपूर: दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून सर्व कर्मचारी संघटनांच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

या तीन्ही कंपन्यातील विदद्युत सहायक यांना नऊ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एचएसबीसी, फोर्ट, मुंबई येथे सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.