Published On : Wed, Oct 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

दीक्षाभूमी परिसरातून 144 टन कचऱ्याची उचल

मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केले अहोरात्र काम; 58 हजार अनुयायांनी घेतली आपली बसची सेवा
Advertisement

दीक्षाभूमी परिसरातून 144 टन कचऱ्याची उचल

नागपूर, : ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. घनकचरा व्यवस्थापन विभागाने दीक्षाभूमी परिसरातून तीन दिवसत एकूण १४४ टन कचऱ्याची उचल केली. याशिवाय अंबाझरी, बेझनबाग व उंटखाना या परिसराची स्वच्छता करण्यात या सफाई कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. यासाठी तीन पाळ्यांमध्ये 872 सफाई कर्मचारी, 234 कचरा संकलक, 3 सक्शन मशीन, 3 चोकेज मशीन, 190 कचरा कुंड्या, कचरा वाहून नेण्यासाठी 108 गाड्यांचा वापर करण्यात आला. भांडेवाडीमध्ये कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी 4 कॉम्प्रॅक्टरचा वापर करण्यात आला. यामुळे लाखो अनुयायांचे आगमन झाल्यानंतरही शहराची स्वच्छता राखण्यास मनपा प्रशासन यशस्वी झाले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेने नागरी सुविधा, स्वच्छता व वाहतुकीची जबाबदारी पार पडली. गेल्या 18 ऑक्टोबरपासून मनपाचे कर्मचारी 24 तास कामावर लागले होते. त्यांच्या तीन पाळ्यांमध्ये कामाचे वाटप करण्यात आले होते. प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोझल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. शहरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी महापौर निता ठाकरे आणि आयुक्त डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार नियोजन करण्यात आले. महापौर यांच्यासह उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी नियमित पाहणी केली.

अतिरिक्त आयुक्त श्री.अंकीत, अतिरिक्त आयुक्त श्री.मुरुगानंथम एम. व अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी ही हे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आयुक्त डॉ. विपीन यांनी जातीने या व्यवस्थेकडे लक्ष दिले. 20 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी सुद्धा आयुक्तांनी नागरी सुविधांची पाहणी करून अनुयायांना काही अडचणी तर येत नाही, याची शहानिशा करून घेतली. त्यांनी अनुयायांशी चर्चा करून नागरी सुविधांबद्दल मत जाणून घेतले.

दीक्षाभूमी परिसरातून 144 टन कचऱ्याची उचल

Advertisement

अशी होती स्वच्छतेची यंत्रणा

शहरात लाखो अनुयायी येत असल्याने निर्माण होणारा कचऱ्याची उचल व त्याची विल्हेवाट लावण्याचे मुख्य काम मनपाच्या घनकचरा व्यवस्थापना विभागाचे होते. यासाठी मनपाने विविध पातळ्यांवर नियोजन करून ही व्यवस्था यशस्वीपणे पार पाडली. शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या अॅन्टोनी वेस्ट हॅंडलिंग कंपनी व मे. बीव्हीजी इंडिया लिमीटेडच्या सहाय्याने केले. या दोन्ही कंपन्यांनी तीन पाळ्यांमध्ये 108 वाहने तैनात केली होती. कचरा संकलित करण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे 234 कर्मचारी तैनात होते. उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, स्वच्छता अधिकारी श्री. ऋषीकेश इंगळे यांच्या नेतृत्वात ही मोहिम यशस्वी करण्यात आली. याशिवाय एनडीएसचे कर्मचाऱ्यांनी सुद्धा स्वच्छतेमध्ये योगदान दिले. एनडीएसचे प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात एनडीएसचे पथक दीक्षाभूमी परिसरात तैनात होते.

1200 शौचालये

अनुयायांच्या निवार्यासाठी दीक्षाभूमी परिसरात 21 डोम उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे 1200 वर शौचालये उभारण्यात आले होते. ही सर्व शौचालये गडर लाईन्सशी जोडण्यात आली होती. परिसरात किंवा रस्त्यावर होणारा कचरा त्वरित उचलण्यासाठी सफाई कर्मचारी तैनात केले होते. ही सेवा मनपाने 24 बाय 7 ठेवली होती. नागपूर महानगरपालिकेद्वारे ४४ स्थायी सीसीटीव्ही कॅमेरे व १६ अस्थायी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून सुरक्षा व्यवस्थेकरीता पोलिस विभागास मदत करण्यात आली. पिण्याची पाण्याची व्यवस्थेकरीता रस्त्यावर १२० नळांची व्यवस्था तसेच प्रत्येक निवारा केंद्रावर पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे.अतिरिक्त प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे.

जागोजागी कचरा कुंड्या

दीक्षाभूमी परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा कुंड्या ठेवल्या होत्या. या कचरा कुंड्यांमध्ये कचरा जमा होत असल्याने रस्त्यांवर कचरा कमी साचला होता. रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये सफाई कर्मचारी तैनात होते. जमा होणारा कचरा भांडेवाडीमध्ये नेण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये काम करण्यात आले. दोन पाळीमध्ये एकूण 108 वाहनांच्या सहाय्याने कचरा तात्काळपणे भांडेवाडीमध्ये नेण्यात आला. सफाई कर्मचार्यांच्या या कामामुळे दीक्षाभूमी परिसरात कचरा साचून राहिला नाही.

58 हजार अनुयायांनी घेतली आपली बसची सेवा

दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेस, चिचोली येथील शांतीवनात जाण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाने आपली बसची विशेष व्यवस्था केली होती. 18 ते 20 ऑक्टोबर या काळात दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेश, चिचोली व शहरातील इतर भागात 58 हजार 84 प्रवाशांनी आपली बसच्या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे यांनी दिली.

दीक्षाभूमीवर आपली बसची व्यवस्था 18 ऑक्टोबरपासून सुरू केली होती. यासाठी मनपाने 267 बस तैनात केल्या होत्या. 18 ऑक्टोबरला दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत 12 बसनी 1204 प्रवाशांनी प्रवास केला. 19 ऑक्टोबरला दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस साठी 49 बसची व्यवस्था केली होती. यातून 9625 अनुयायांनी या सेवेचा लाभ घेतला. तसेच दीक्षाभूमीहून चिचोलीला जाण्यासाठी 6 बसमधून 534 प्रवाशांनी प्रवास केला.

एकाच दिवशी 41 हजार प्रवाशी

20 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी सर्वाधिक 41 हजार 175 अनुयायांनी आपली बसचा लाभ घेतला. यासाठी मनपाने 145 बसची व्यवस्था केली होती. याशिवाय या दिवशी नारा, चिचोली, नारी, गांधीपुतळा, बेलतरोडी, यशोधरानगर, गिड्डोबानगरसाठी साठी आपली बसने प्रवाशांनी प्रवास केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.