Published On : Fri, Apr 24th, 2020

कोविड हेल्थ सेंटर साठी ऑक्सिजन सह 1320 बेड ची सुविधा उपलब्ध- रविंद्र ठाकरे

नागपूर । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचारासाठी ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर ची सुविधा असलेल्या रुग्णालयात सरासरी एक हजार 320 बेड असलेले कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी श्री ठाकरे यांनी केंद्रीय राखीव दलाच्या CRPF रुग्णालय, लता मंगेशकर हॉस्पिटल व शालिनीताई मेघे मेडीकल रुग्णालया ची पहाणी केली,

कोविड हेल्थ सेंटर साठी ऑक्सिजन ची सुविधा असलेले लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये 600 बेड , शालिनीताई मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथें 600 बेड, तसेच सीआरपीएफ येथे 120 बेड उपलब्द आहेत, तसेच 50 ते 60 व्हेंटिलायझर ची सुविधा सुद्धा उपलब्द होऊ शकते, रुग्णालय सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्याचे यावेळी रुग्णालय प्रशासना तर्फे सांगितले,