Published On : Sat, Feb 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बारावी पेपरफुटी घोटाळा; ट्युशन क्लास चालकांच्या जाळ्याचा पर्दाफाश, ९ आरोपी गजाआड

Advertisement

नागपूर : बारावी बोर्ड परीक्षेतील रसायनशास्त्र पेपरफुटी प्रकरणात तपास अधिक खोलात जात असताना खासगी ट्युशन क्लास चालकांची साखळी समोर आली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून या रॅकेटमध्ये आणखी दोन क्लासेसची नावे समोर आली आहेत.

वैशाली नगर परिसरातील एका ट्युशन क्लासमधील शिक्षकाचा या कटाशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, दुसऱ्या शाळेतील शिक्षक प्रदीप जांगडे यांनी व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका दिनेश कोटांगले याच्याकडे पाठवली. त्यानंतर कोटांगलेने तीच प्रश्नपत्रिका ‘एक्सेलेंट ट्युशन क्लास’चे संचालक मुस्तफा खान यांना पुढे पाठवल्याचे उघड झाले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा प्रकार १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशात आला. St. Ursula High School येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याआधीच पेपर बाहेर गेल्याची माहिती पर्यवेक्षकांना मिळाली. संशयाच्या आधारे प्रसाधनगृहात गेलेल्या एका विद्यार्थिनीची तपासणी केली असता तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला. मोबाईलच्या पडताळणीत सकाळी १०.३७ वाजता ‘XII’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर रसायनशास्त्राचा पेपर व त्याची उत्तरे शेअर झाल्याचे समोर आले.

आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीनाचा देखील सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुस्तफा खान, जुनेद मोहम्मद अब्दुल जावेद, निशिकांत मूल, फरहान अख्तर, दिनेश कोटांगले, प्रदीप जांगडे, मनीष शंभरकर आणि संदीप नरडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी मनीष हा क्लास चालक तर संदीप नरडकर शिक्षक असल्याची माहिती पुढे आली आहे.

Advertisement

एक आरोपी जामिनावर सुटला असला तरी इतर तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तपास यंत्रणा या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी कसून चौकशी करत असून आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.