Published On : Fri, Mar 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 127 प्रकरणांची नोंद

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (9) रोजी शोध पथकाने 127 प्रकरणांची नोंद करून 49200 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणा-यांवर 1 प्रकरणांची नोंद करून रु 200 रुपयांचा दंड वसुल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 32 प्रकरणांची नोंद करून 12800 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 1500 रुपयांची वसुली करण्यात आली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून रु 13000 दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर 59 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 11800 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 5 प्रकरणांमध्ये 5000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख श्री संजय खंडारे, धरमपेठ झोनचे श्री. धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे श्री. पवन डोंगरे, धंतोली झोनचे श्री. नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे श्री. नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे श्री. सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे श्री. प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे श्री. सुधीर सुडके, आशीनगर झोनचे श्री. संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे श्री. नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges