
नागपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील तब्बल १२५ तर ग्रामीण भागातीलही कंत्राटी परिचारिका संपावर गेल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व विदभार्तील ४,३३५ कर्मचारी संपात असल्याने येथील रुग्णसेवा वाऱ्यावर आहे.
पूर्व विदभार्तील सहा जिल्ह्यांत आयुषअंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील कर्मचारी व तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अर्धपरिचारिका, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी असे एकूण ५ हजार ३८६ कंत्राटी अधिकारी- कमचार्री कार्यरत आहे. त्यापैकी ४ हजार ३३५ अधिकारी- कर्मचारी गुरूवारी संपात सहभागी झाले.
सध्या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आयुषअंतर्गत काम करणारे डॉक्टर्स, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत डॉक्टर्स, क्षयरोग विभागातील कर्मचारी व तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि अर्धपरिचारिका, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य आरोग्य कर्मचारी आहेत. त्यामुळे बहुतांश अधिकारी- कर्मचारी संपावर असल्याने रुग्णाचे हाल होत आहेत.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
साखळी बुद्रुक में गहराया भीषण जल संकट.. #latestnews #maharashtranews
रवी राणा का विपक्ष पर बड़ा हमला.. #latestnews #politicsnews #amravati
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
वेरूळ शिक्षक मौत मामले में पुलिस पर सवाल ...#latestnews #breakingnews #news #maharashtranews







