Published On : Thu, Feb 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 124 प्रकरणांची नोंद

Advertisement

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (22) रोजी शोध पथकाने 124 प्रकरणांची नोंद करून 70500 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 500 रुपयांचा दंड वसुल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 35 प्रकरणांची नोंद करून 14000 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 1800 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून रु 28000 दंड वसूल करण्यात आला. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला.

Advertisement

या व्यतिरिक्त इतर 26 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 5200 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 15 प्रकरणांमध्ये 15000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख श्री वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख श्री संजय खंडारे, धरमपेठ झोनचे श्री. धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे श्री. पवन डोंगरे, धंतोली झोनचे श्री. नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे श्री. नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे श्री. सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे श्री. प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे श्री. सुधीर सुडके, आशीनगर झोनचे श्री. संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे श्री. नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.