Published On : Tue, Jul 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

युनियन बॅंक कांद्री येथे अज्ञात आरोपीने १,२०,५२१ रूपये काढुन केली फसवणुक

Advertisement

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किमी अंतरा वरील युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे अज्ञात आरोपी ने फिर्यादी च्या पत्त्नी च्या खात्यातुन १,२०,५२१ रुपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.२) जुलै ते गुरु वार (दि.१४) जुलै ला दुपारी १२ ते १२.३० वाजता च्या दरम्यान राजेंद्र बालाजी वानखेडे वय ५६ वर्ष राह. धर्मराज शाळा समोर वार्ड क्र. ७ कांद्री कन्हान यांची पत्नी हि युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे गेली.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तेव्हा समजले कि अज्ञात आरोपी ने तिचे व तिच्या पतीच्या खात्यातुन अँझान पेटीएम गुगल या एप्स द्वारे एकुण १,२०,५२१ रूपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी राजेंद्र बालाजी वानखेडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement