Published On : Wed, Mar 25th, 2020

जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक

रामटेक: कोरोना मुळे आज संपूर्ण देश धोक्यात आहे. नागपूर जिल्ह्यात कर्फ्यु आणि संचारबंदी लागू केली आहे. जिवणावश्यक समान लागणारे दुकान सोडून सगळे हॉटेल, बार, दुकान पूर्णपणे बंद केले आहे.

देशभर जमावबंदी असूनही रामटेक येथील मौजा शितलवाडी येथील किट्स कॉलेज रोडवरील हॉटेल रॉयल येथे 23 मार्चला 52 तास पैशाची बाजी लावून हारजितचा जुगार खेळत आहे अशी माहिती रामटेक पोलिसांना भेटली .

या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर ,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर,सहायक पोलिस निरीक्षक शेंडगे,पोलीस उपनिरीक्षक हत्तीमारे,सदाशिव काटे,कोडवते, सुरेश धुर्वे, आकाश सिरसाट, गोविंद खांडेकर,शाबीर शेख,अनिल इगले यांनी हॉटेल रॉयल येथे रेड केली काही आरोपी पोलिसांना पाहूनच तिथून पळ काढला पण जुगार खेळणाऱ्या 12 जणांना रामटेक पोलिसांनी पकडले.घटनास्थलावरून 2,44,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला 12 ही जणांविरुद्ध 23 मार्चला पोलीस स्टेशन रामटेक येथे अप क्र 198/2020 अनवये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहा पो नी दत्तप्रसाद शेंडगे करीत आहेत.