कामठी: पोषण अभियानाची जवाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी च्या वतीने 115 अंगणवाडी सेविकांना मोफत अँड्रॉईड मोबाईल वितरित करण्यात आले असून या अंगणवाडी सेविका कडून कुटुंब व्यवस्थापनाचा पहिला टप्पा सुद्धा पार पडला आहे.
केंद्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने 10 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्रामध्ये पोषण आहार उपक्रम हाती घेण्यात आला आहे हा उपक्रम कामठी तील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कामठी च्या वतीने योग्यरीत्या राबविण्यात येत असून या अभियान अंतर्गत 0 ते 6 वर्ष बालंका मधील बुटकेपणाचे प्रमाण आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण 6 टक्क्यावरून 2 टक्क्यांवर आणणे,6 ते 59 महिने या वयोगटातील बालकामधील तसेच 15 ते 49 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलामधील रक्तक्षयचे प्रमाण 9 टक्क्यावरून 3 टक्क्यांवर आणणे तसेच जन्मजात कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण 6 टक्क्यावरून 2 टक्क्यांवर आणणे हे कामे प्राधान्याने करण्यात येत असून ही कामे प्रभावी पने राबवून डिजिटल अंगणवाडी करण्याच्या उद्देशाने कामठीतील 115 अंगणवाडी सेविकांना एका नामवन्त कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल पुरवठा करण्यात आला असून मोबाईल मधील सिम कार्ड विकत घेण्या साठी अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात पैसे वळविण्यात आले असून 800 रुपयाचा सहामहिन्यासाठी रिचार्ज मारून दिलेला आहे.या मोबाईल च्या माधमातून पोषण आहाराची माहिती ऑनलाईन अपडेट करण्यात येत असून कुटुंब व्यवस्थापनाचा पहिला टप्पा सुद्धा पार पाडण्यात आलेला आहे.यामाध्यमातून कामठी तील अंगणवाडी ह्या डिजिटल अंगणवाडी च्या मार्गावर दिसून येतात.
– संदीप कांबळे कामठी