Published On : Thu, Jul 30th, 2020

साची मुलेवार तालुक्यात पहिली बेला परिसरातील शाळेचा 10 वी निकाल 100

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या मार्च 2020 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 100% लागला असून उमरेड तालुक्यातील लोकजीवन विद्यालय बेला येथील दहावीच्या निकालांमध्ये नेत्रदीप यश मिळाले आहे. शाळेचा निकाल 97.77% टक्के लागला असून 237 परीक्षार्थी बसले होते त्यापैकी 225 विद्यार्थी चांगल्या टक्क्याने पास झाले त्यामध्ये उमरेड तालुक्यातून प्रथम क्रमांक *साची सुनील मुलेवार* 97.60 टक्के मार्क घेत तालुक्यातून प्रथम आली तर तेजस संभाजी वाघाडे 93.40% याने द्वितीय क्रमांक पटकाविला अपेक्षा अनिल फुलपाटील 92.60 % घेत तिसरा क्रमांक पटकविला साक्षी सुरेश झाडे 91.40% चौथा तर पूजा सतीश घिमे 90.40% पाचवी आली.

विमलाबाई तिडके हायस्कुलचा निकाल 100 टक्के लागला असून 38 विद्यार्थी परीक्षार्थी होते त्यामध्ये 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले धारणी राजेंद्र तेलरांधे 89% घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला तर चंचल अरविंद कोल्हे 86.66 % घेऊन दुसरा क्रमांक पटकावला ज्ञानेश्वरी धंनराज येरखेडे 82% मिळाले व *विद्याधन हायस्कूल शेडेश्वरचा* निकाल 96. 96% लागला त्यात जानवी नामदेव बाळबुधे 83% घेऊन प्रथम तर साक्षी रमेश काळसरपे 75% दुसरी आली तर दोन्ही हाताने दिव्यांग असलेला आदर्श प्रदीप कुंभारे याने 71.60% गुण मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन यश संपादन केले त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

शिक्षण महर्षी श्री चंपतराव देशमुख व सचिव श्री.सुबोध देशमुख माजी प्राचार्य श्री. दिलीप काळे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक वृंद प्राचार्य श्री दिलीप खरबडे विमलबाई तिडके हायस्कूलचे प्राचार्य राजेंद्र तिडके विद्याधन हायस्कूलचे प्राचार्य शंकर सी राऊत उपमुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर भेंडे परिवेक्षक श्री शरदचंद्र सुपारे शिक्षक श्री राजेश शिवरकर ,रवींद्र वानखेडे, आशिष देशमुख, पांगुळ, शैलेश लोणारे ,प्रगती लोहकरे, यांना जाते त्यांनी सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करीत अभिनंदन केले व पुढील भविष्य च्या शुभेच्छा दिल्या.

तुषार मुठल बेला