नागपूर: नगर युवक शिक्षण संस्थेच्या नॅक ए++ ग्रेड मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई) चा 10 वा पदवीदान समारंभ शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री दत्ता मेघे सभागृह, वायसीसीई कॅम्पस, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. वायसीसीई ही एक स्वायत्त संस्था असून 2010 पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबादचे संचालक व माजी सचिव, डीएसटी, भारत सरकार डॉ. एस. चंद्रशेखर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. बी. माहेश्वरी हे सन्माननीय अतिथी असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी आर. मेघे असतील. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. यु. पी. वाघे तसेच, संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापन मंडळाने केले आहे.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




