Published On : Tue, Jul 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

दहावीसह बारावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात; नागपूर विभागातून ‘इतके’ विद्यार्थी देणार परीक्षा

Advertisement

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेला मंगळवार म्हणजेच आजपासून सुरुवात झाली आहे. दहावीची परीक्षा येत्या ३० जुलै तर बारावीची परीक्षा ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यंदा दहावीला २८ हजार ९७६ आणि बारावी पुरवणी परीक्षेसाठी एकुण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे.

नागपूर विभागातून इयत्ता 10वीसाठी 2600 तर 12वीसाठी 6700 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट- २०२४ मध्ये पुरवणी परीक्षेचे आयाेजन केले आहे.

सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता व दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळ सत्रात अकरा आणि दुपार सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध तसेच छपाई वेळापत्रकच ग्राह्य धरावे असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement