नागपूर:राज्यभरात मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे.
राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर झाल्याने 10वी व 12वीची पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर 12 वीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.
26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नियोजित होता. मात्र आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान होईल.
तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन , अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-2 हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.