Published On : Wed, Jun 9th, 2021

भंडारा जिल्ह्यात आज 106 रुग्णांना डिस्चार्ज

भंडारा– जिल्ह्यात आज 106 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 57627 झाली असून आज 07 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59228 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.30 टक्के आहे.

Advertisement

आज 1893 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 07 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 03 लाख 98 हजार 923 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59228 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

Advertisement

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 03, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 00, लाखनी 03, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 57627 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59228 झाली असून 546 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1055 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.30 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.78 टक्के एवढा आहे.

Advertisement

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

• कोविडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

• साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement