नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना काय स्वस्त झाले काय याची उत्सुकता लागली आहे. या अर्थसंकल्पात देशातील शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शहरांच्या विकासासाठी 10 हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे. 50 नवी पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत. खाजगी क्षेत्राला गती शक्ती डेटा पुरवणार आहे. देशातील 40 हजार नागरिकांच्या घरांचे स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होणार आहे.
दरम्यान, या अर्थसंकल्पात सात मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. सर्वात जास्त लक्ष शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणांकडे लागले आहे.
शेतकऱ्यांना विनाक्रेडिट कर्ज देणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.दरम्यान संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे वाचन करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वात देश बळकट होईल, असे म्हटले आहे. उद्योग, आरोग्य, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रात काही तरतुदी करण्यात आल्या आहेत.