Published On : Sat, Aug 28th, 2021

नकाशा मंजुरीचे नगररचना विभागाला प्राप्त झाले १०० कोटी

Advertisement

उद्दीष्टापैक्षा अधिक आवक : पुढील सात महिन्यात २१९ कोटींचे उद्दीष्ट

नागपूर : मागच्या वर्षी कोरोना काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती खराब होती. कोरोनामुळे घरकुल निर्माणचे नवीन प्रकल्प रखडलेले होते. नागपूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या उत्पन्नावर सुद्धा याचा परिणाम झाला. मागील वर्षी केवळ रु ५६ कोटी नगररचना विभागाला नकाशा मंजुरीतुन प्राप्त झाले होते. यावर्षी ऑगस्ट महिन्यातच १०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

Advertisement
Advertisement

यावर्षी नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, नवीन घरकुल प्रकल्प अस्तित्वात येत आहे आणि मनपाकडे मोठ्या प्रमाणात नकाशे मंजुरीसाठी प्राप्त होत आहे. मागील वर्षीची प्राप्त रक्कम बघता स्थायी समिती तर्फे अर्थसंकल्पात यावर्षी फक्त रु ८६ कोटी चे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दीष्ट ऑगस्ट महिन्यातच पूर्ण झाले असून आतापर्यंत १०० कोटी मनपाला प्राप्त झाले आहेत.

मार्च २०२२ पर्यंत रु २१९ कोटी आणखी प्राप्त व्हावे या दिशेने कार्य करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी नगररचना विभागाला दिले.

मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सभापती प्रकाश भोयर विविध विभागाची बैठक घेत आहे. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिल मध्ये ८. ४५ कोटी, मे मध्ये १६.४१ कोटी, जुने मध्ये २६.८ कोटी, आणि जुलै मध्ये २६ कोटी प्राप्त झाले आहे. गुंठेवारी मधून सुद्धा रु २१ कोटी मनपा ला प्राप्त झाले आहेत. वर्ष २०१९-२०२० मध्ये रु १९३ कोटी विभागाला मिळाले होते. वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे फक्त ५६ कोटी रु प्राप्त झाले. सभापती यांनी त्यांना २०२१-२०२२ मध्ये नवीन लक्ष्य ३१९ कोटीं निर्धारित केले आहे. याच्यातून रु १०० कोटी विभागाला प्राप्त झाले आहेत. पुढील सात महिन्यात रु २१९ कोटी अपेक्षित आहे. विभागाकडे प्रलंबित नकाशे लवकरात – लवकर मंजूर करण्याचे निर्देश यावेळी सभापतींनी दिले. विभाग प्रमुखांनी सांगितले कि ऑनलाइनमुळे नकाशा मंजुरीस विलंब होत आहे. यावर तोडगा काढुन नकाशे मंजुरीच्या प्रक्रियेला वेग आणा आणि मनपाच्या उत्पन्नात भर घाला, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी नगररचनाकार हर्षल गेडाम यांच्यासह दहाही झोनचे नगररचना विभागाचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement