Published On : Mon, Jun 4th, 2018

नागपूराच्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश

Garbage
नागपूर: सध्याच्या परिस्थितीत प्रदूषण फार मोठी समस्या बनली आहे. जगात सर्वात जास्त प्रदूषण हे प्लास्टिकमुळे होत असते. कारण प्लास्टीक हे मानवाच्या जीवनशैलीत एक महत्वाचे घटक बनले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला असतो . भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे.

यातच नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो. हा कचरा जशास तसा डम्पिंग यार्डमध्ये जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने भांडेवाडीत लाखो मेट्रिक टन कचरा आजही पडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून भांडेवाडीत आग लागण्यासारखे प्रकार नेहमीच घडताना दिसताहेत.

युनायटेड नेशनतर्फे १९७४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी पर्यावरण दिनावर एक थीम ठेवल्या जाते. यावर्षी युनायटेड नेशनने ‘बीट द प्लास्टीक वेस्ट’ ही थीम ठरविली आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये कमी जाडीच्या प्लास्टीक बॅग विक्रीवर बंदी आणली होती. सोबतच भारतात पर्यावरणाच्या बाबतीत होत असलेले काम, स्वच्छतेसाठी देशभरात राबविण्यात आलेले अभियान यामुळे भारताला या थीमवर काम करण्यासाठी प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्लास्टिक हे असे पदार्थ आहे त्याचे सहजपणे विघटन होत नाही. पृथ्वीवर प्लास्टीकचे अस्तित्व बराच काळ टिकते.घन कचऱ्यात प्लास्टीकचे अस्तित्व १० ते १२ टक्के असते. प्लास्टीक जळाल्यानंतर त्यातून मर्क्युरी, डायआॅक्साइन, फ्युरनसारखे घातक पदार्थ उत्सर्जित होतात. या घातक पदार्थापासून कर्करोगाचा धोका निर्माण होतो. भारतात प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतात तर प्लास्टीकच्या पन्नीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पाळीव जनावरांच्या मृत्यूमागे प्लास्टीक हे मोठे कारण पुढे आले आहे. समुद्र आणि तलावाच्या इकोसिस्टमला प्लास्टीकचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टीकच्या प्रदूषणाची ही भयावह स्थिती लक्षात घेता, प्लास्टीकच्या वापरावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टीकवर बॅन आणले आहे. प्लास्टीकच्या मोठमोठ्या कारखाने आहेत. अनेक लोक त्या कारखान्यामध्ये काम करतात. त्यामुळे प्लास्टीक बंदी महाराष्ट्र सरकारसाठी शक्य नाही. युनायटेड नेशनच्या मते एकदा उपयोगात येणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्लास्टीक प्रदूषण कमी होऊ शकते. प्लास्टीक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी वस्तूच्या लाईफ सायकलची गॅरंटी घेऊन, वस्तू खराब झाल्यानंतर परत घेऊन त्याचा उपयोग झाला पाहिजे. घनकचरा संकलनाचे व्यवस्थापन सुधारावे लागेल. सरकारला प्लास्टीकचा पर्याय शोधावा लागेल.

दरवर्षी जगभरात ५०० बिलियन प्लास्टीक बॅगचा उपयोग होतो. त्यातील १३ मिलियन प्लास्टीक दरवर्षी समुद्रात जाते. त्यामुळे सुमारे १ लाख समुद्री जीव प्लास्टीकमुळे मरतात. १७ मिलियन बॅरल आॅईल प्लास्टीक बनविण्यास वापरले जाते.

Advertisement
Advertisement