Published On : Wed, Apr 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात 10 पोलिस, एक नागरिक ठार

Advertisement

रायपूर: छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात दहा पोलिस आणि एक नागरिक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलवादी हल्ल्यारवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली. हे अत्यंत दुःखद आहे आणि नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही.

मिळालेल्या वृत्तानुसार दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूरजवळ जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर नक्षलवाद्यांनी आयईडी हल्ला केला. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानातून पोलीस परतत होते. हे पोलीस छत्तीसगड पोलिसांचे विशेष दल जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पोलिसांना ज्यांना नक्षलवाद्यांशी लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बस्तरमधील बंडखोरांविरुद्ध अनेक यशस्वी ऑपरेशन्समध्ये डीआरजीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी संवाद साधल्याची माहिती आहे.

क्षलविरोधी मोहिमेसाठी आलेल्या दलाला लक्ष्य करणाऱ्या आयईडी स्फोटात आमचे 10 डीआरजी जवान आणि एक चालक शहीद झाला, असे ट्विट मुख्यमंत्री बघेल यांनी केले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.