Published On : Mon, Dec 27th, 2021

कन्हान-900’ मुख्य जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्तीसाठी १०-तासांचे शटडाऊन २७ डिसेंबर च्या रात्री   

Advertisement

शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार. 

नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण  केंद्र  वरून शहराकडे येणाऱ्या  ९०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील  उद्भवलेल्या गळत्या दुरुस्त करण्यासाठी १० तासांचे शटडाऊन- डिसेंबर २७ (सोमवार ) रात्री १०  ते  डिसेंबर २८ (मंगळवार ) २०२१  सकाळी ७  दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.. या कामांमुळे सतरंजीपुरा आणि आशी नगर झोनमधील ९ जलकुंभांचा पाणीपुरवठा डिसेंबर २८ (मंगळवार ) २०२१  दरम्यान  संपूर्णपणे बाधित राहणार आहे.

ह्या शट डाऊन दरम्यान कन्हान -९०० जलवाहिनीवर का मठी रोडवरील गळती, बिनाकी जलकुंभावर असलेली कन्हान-७०० जलवाहिनीवरील गळती तसेच कन्हान ३०० जलवाहीवर असलेली बेझनबाग फ्लाय ओव्हर जवळील मोठी गळती दुरुस्त करण्याचे काम करण्यात येणार आहे..

विनाकारण वाया जाणारे पिण्याचे पाणी वाचविण्याच्या दृष्टीने,  कन्हान- ९०० तसेच कन्हान-७०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर,ह्या गळत्या दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. 

ह्या शटडाऊन  कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे. 

या 10 तासांचे शटडाऊन- कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील:
आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २ जलकुंभ , इंदोरा १ व २ जलकुंभ , इंदोरा गमदूर डायरेक्ट टॅपिंग,

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १ जलकुंभ , बस्तरवारी २जलकुंभ व बस्तरवारी ३ जलकुंभ,

या शटडाऊन- दरम्यान जवळपास सतरंजीपुरा, आणि आशी नगर झोन्समधील ९ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे. 

आशी नगर झोन : ४ जलकुंभांची स्वच्छता डिसेंबर २७ ते ३० दरम्यान

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा  मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. आशी नगर झोन अंतर्गत नारा  जलकुंभ, डिसेंबर २७ (सोमवार), नारी जलकुंभ डिसेंबर २८ (मंगळवार), जरीपटका जलकुंभ, डिसेंबर २९ (बुधवार) आणि बेझनबद्घ जलकुंभ , डिसेंबर ३० (गुरुवार)   रोजी स्वच्छता करण्यात येतील   जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील. ह्या जलकुंभ स्वच्छता  शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


नारा जलकुंभ : सोमवार: २७.१२.२०२१
ओम नगर, आर्य नगर, निर्मल कॉलोनी, शंभू कॉलोनी, नारा वअक़सti, ओम साई नगर, अलंकार सोसाटी, तवक्कल सोसाटी, शिवगिरी सोसाटी, कोहिनूर सोसाटी, वेड नगर, प्रेम नगर, नुरी कॉलोनी, तिरुपती नगर, कृष्णधाम सोसाटी.

नारी  जलकुंभ: मंगळवार: २८.१२.२०२१
हौसिंग बोर्ड, कुकरेजा नगर, कस्तुरबा नगर, गुरुनानक सोसाटी, नागपूर सुधार प्राण्यास वसाहत, वे को.ली वसाहत, छोटा मार्टिन नगर, स्नेहदीप कॉलोनी, पिरॅमिड सोसाटी, इंदिरा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, लहानुजी नगर, ढांगाए नगर, ख़ुशी नगर, छोटा हुडको, नागार्जुन नगर, हिरा नगर, सुगत नगर, विश्राम नगर, बालजीत नगर, कस्तुरबा नगर, सुशीला ले आउट.

जरीपटका जलकुंभ: बुधवार: २९.१२.२०२१
शेंडे नगर, मानव नगर, चैतन्य नगर, प्रभात कॉलोनी, सुतयोग्य नगर, सन्याल नगर, बँक कॉलोनी, नालंदा नगर, कपिल नगर, कामगार कॉलोनी, समर्थ नगर, मयूर नगर, बबडेओ नगर, कडू ले आउट, राजगृह नगर, नरी गाओ, सत्यशील नगर, दीक्षित नगर, फिरोज कॉलोनी, तेगीय नगर, दीपक नगर, सकारण सोसाटी आणि इतर भाग 

बेझन बाग  जलकुंभ: गुरुवार : ३०.१२.२०
दयाळ सोसायटी, दयानंद नगर, सिंधू सोसायटी, गुरुनानक नगर, बँक कॉलोनी, वासनशाह चौक, संगीत बिल्डिंग , में बाजार रॉड, हेमू कॉलोनी, जुना जरीपटका, महात्मा फुले नगर, बेझन बाग ले आउट, खंडन ले आउट आणि इतर भाग

ह्या जलकुंभ स्वच्छता आणि शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.