Published On : Mon, Feb 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मिहानमध्ये १ लाख युवकांना मिळणार रोजगारची संधी ; नितीन गडकरींचे विधान

नागपूर:मिहानमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगार मिळेल,असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.मिहान येथे ‘क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’च्या कार्यालयाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने काम व्हावे. तसेच कृषिआधारित व्यवस्था विकसित करण्यावर फोकस करणे आणि विदर्भातील शेतकऱ्यांची प्रगती कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

गडकरी यांनी क्लिक टू क्लाउड कंपनीद्वारे विकसित ‘अ‍ॅग्रिपायलट’ या प्रकल्पाचे सादरीकरण बघितले. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे उत्पादन वाढविण्यास फायदेशीर ठरणारा हा प्रकल्प आहे. कंपनीद्वारे कॉम्पॅक्ट सॉइल डॉक्टरची निर्मिती करण्यात आली असून शेतकऱ्यांना काही मिनिटांमध्ये मृदा परीक्षण करून मिळेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनी २०० ते ३०० जणांना रोजगार देणार आहे.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान कार्यक्रमाला मिहान सेझचे विकास आयुक्त व्ही. श्रमन, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री, क्लिक टू क्लाउड संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिश्रा, कुसुमलता मिश्रा उपस्थित होते.

Advertisement