Published On : Thu, Apr 30th, 2020

गावठी दारू हातभट्टीवर धाड, एका आरोपीसह १ लाखाचा माल जप्त

Advertisement

कन्हान : – कन्हान नदी काठावरील सत्रापुर लेबर कम्प शिवारात गावठी मोह फुलाची दारू हातभट्टी लावुन काढताना कन्हान पोलीसानी धाड मारून एका आरोपीसह नऊशे लिटर सळवा व ७० लिटर मोहाची दारू असा एकुण एक लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल पकडला .

गुरूवार (दि.३०) ला दुपारी २ वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीसानी कन्हान नदी काठावर सत्रापुर शिवारात लेबर कम्प मागे हात भट्टी लावुन गावठी मोहफुलाची दारू काढत असताना धाड मारून एका आरोपीसह ७० लिटर मोहफुलाची ताजी दारू किमत १४ हजार रू व ९०० लिटर मोहफुल सळवा किमत ९० हजार रू अशा एकुण १ लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल नाश करून आरोपी सागर देविदास हुमने वय २२ वर्ष रा. सिहोरा कन्हान यांस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेश नचे सपोनि अमितकुमार आत्राम, सपोनि सतिष मेश्राम, राजेंद्र पाली, नापोशि राजेंद्र गौतम, पोशि विरेंद्रसिह चौधरी, मंगेश सोनटक्के, संजु बरोदिया, मुकेश वाघाडे, विशाल शंभरकर आदीने शिता फितीने कामगीरी बजावुन कन्हान पोली सानी कार्यवाही उत्तमरित्या पार पाडल्या ने नागरिकाकडुन कौतुक होत आहे