‘शू-टेक 2020’ कार्यक्रमात ई संवाद
नागपूर: देशातील फूटवेअर उद्योगाचा अर्थव्यवस्थेत आणि रोजगार निर्मितीत महत्त्वाचा सहभाग आहे. निर्यातक्षम उत्पादन आणि विविध डिझाईन व तंत्रज्ञानाच्या साह्याने या उद्योगाने निर्यातीचे 1 लाख कोटींचे लक्ष्य ठेवावे, असे मत केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
इंडियन फूटवेअर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या शू-टेक 2020 या कार्यक्रमात ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले- फूटवेअर हा उद्योग रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी या उद्योगाचा महत्त्वाचा सहभाग आहे. बूट, चप्पल निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल विविध देशातून आयात केला जातो. पण आपल्या देशात कच्चा माल उपलब्ध आहे. त्याचा वापर करून व आकर्षक डिझाईनचे उत्पादन आपण निर्यात करू शकलो पाहिजे, या उद्देशाने कस्टम ड्युटीत शासनाने वाढ केली आहे. हा निर्णय आयात कमी करून निर्यातीला प्रोत्साहन देण्यारा आहे.
दररोज नवीन तंत्रज्ञान येत आहे. लोकांच्या आवडी बदलत आहेत, हे लक्षात घेता आकर्षक डिझाईक, किंमत कमी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन असेल तर निर्यात करणे शक्य होते. या उद्योगाने 15 वर्षानंतरचा दृष्टिकोन ठेवून उद्योगाचा विकास सकसा होईल, याचे नियोजन करावे आणि त्या दृष्टीने आपले उत्पादन तयार करून निर्यात वाढवावी. यासाठी शासन सर्व मदत करण्यास तयार आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
फूटवेअर उद्योगाच्या विकासासाठी लहान लहान उद्योग समूह बनविले गेले पाहिजे. त्या ठिकाणी उद्योगाला लागणारे सहायक उद्योजक काम करू शकतील. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देता येतील. तसेच या उद्योगासाठी नवीन तंत्रज्ञा

