Published On : Thu, Aug 22nd, 2019

कामठी बस स्टँड चौकातून 1 लक्ष 74 हजार रुपयाच्या अंमली पदार्थासह तस्करबाजास अटक

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन मार्ग ते बस स्टँड चौक परिसरात गुप्तचर पद्धतीने अवैधरित्या मोठ्या प्रमाणात अंमली गांजा, अफीम , पांढरा पावडर यासारख्या अंमली पदार्थाची तस्करी होत असून यासंदर्भात पोलिसांनी कित्येकदा कारवाही सुद्धा केले आहेत तसेच बस स्टँड चौकातील पानठेल्याच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात या अंमली पदार्थाचा सेवन करीत असून येथील तरुणाई नशेच्या आहारी गेलेले आहेत

यानुसार मुंबई वरून एक तस्करबाज लाखो रुपयांचा एम डी नामक अंमली पदार्थ कामठीत आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकांनी यशस्वीरीत्या सापळा रचून तळ ठोकून बसले असता सदर तस्कर बाज काल रात्री साडे अकरा दरम्यान लाखो रुपयाचा एम डी अंमली पदार्थ देण्यासाठी बस स्टँड चौकाजवळील सराय झोपडपट्टीजवळ येताच पोलिसांनी त्वरित धाड घालून आरोपीस अटक करून त्याच्याकडून तस्करी साठी आणलेला 1 लक्ष 74 हजार रुपयांचा एम डी नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.अटक आरोपीचे नाव सुशांत प्रभाकर तांबे वय 28 वर्षे रा.कामगार वसाहत देवनगर मुंबई असे आहे.मात्र हा लाखो रुपयाचा एम डी नामक अमली पदार्थ मुंबई वरून कुणास देण्यासाठी आला होता हे अजूनही अनुत्तरित आहे.

ही यशस्वी कारवाही पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे , डीसीपी शिवलिंग राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनार्थ अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, विजय कसोधन, सफी, विठोबा काळे, अर्जुनसिंग ठाकूर, दत्ता बागुल, तुलसीदास शुक्ला, प्रदीप पवार, सतीश पाटील, नितीन मिश्रा, नितीन साळुंखे, रुबिना शेख यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी