Published On : Sun, Jun 28th, 2020

विद्युत मंत्र्यांच्या घरावर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा विद्युत बिलवाढी च्या विरोधात मोर्चा

Advertisement

नागपूर शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानावर त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या संघटनेच्या, आणि त्यांच्या समाज बांधवांचा मोर्चा… मागील तीन महिन्यात लॉक डाउनलोड 100 युनिट दर महिन्याला माफ करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र तीन महिन्यात मीटर रीडिंग न करता मनमानी बिल जनतेच्या हाती देण्यात आले. प्रत्येक महिन्याला 100 याप्रमाणे 300 युनिट बिल माफ करण्याची मागणी जनतेची आहे. सोबतच सरासरी बिलापेक्षा यंदा लोकांना चार ते सहा पट अतिरिक्त बिल आले आहे. विद्युत बिल माफी ची घोषणा करून, ती न करता अतिरिक्त बिल लावण्याचा गैरव्यवहार झाल्याने जनता त्रस्त झाली आहे. हे मनस्तापाचा चे संदेश घेऊन आलेले विद्युत बिल हाती घेऊन. आज ऊर्जा मंत्र्यांचे कार्यकर्ते आणि समाज बांधव त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असता…

लोकांची गर्दी ( सोशल डिस्टंसिंगचा फज्जा)असे सांगून, पोलिसांचा मोठा ताफा बोलावून नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांना पळवून लावले. जमावातील मोजक्या लोकांशी मी नंतर बोलतो असे आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिले. झाल्या प्रकाराबद्दल कार्यकर्ता कार्तिक लारोकर व त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांशी बोलल्यास कळले. आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्याच प्रभागात, मतदार संघात राहतो.

ऊर्जा मंत्रांना विद्युत बिलाच्या संदर्भात आम्ही तीन, चारवेळा भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हाला त्यांना भेटू देत नाहीत. आंदोलन करू असा इशारा दिल्यावर आंदोलन करू नका असे ही आम्हाला सांगण्यात आले होते. आम्ही फक्त विजेची बिल घेऊन इथे आलो आहोत. आमच्या मागण्या त्यांनी ऐकाव्यात.असे कार्तिक लारोकर ने सांगितले.