Published On : Thu, Jun 4th, 2020

नागपुरातील बजाजनगर व गांधीबाग परिसर सील

नागपूर : महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील बजाजनगर व गांधीबाग झोनमधील प्रभाग १९ मधील गांधीबाग कपडा मार्केट या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बजाजनगर प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस – उत्कर्ष विशाखा अपार्टमेंट
उत्तरेस – रस्ता (उत्कर्ष अपार्टमेंट ते गोल्हर प्लॉट नं. १०७)
उत्तरपूर्वेस – गोल्हर प्लॉट नं. १०७
पूर्वेस – प्लॉट नं. १२७, रजनी नशिने यांच्या घरापासून ते प्लॉट नं. १२५ ते प्लॉट नं. १५० महंत ते करुणा भवन ते सागर किराणापर्यंत
दक्षिणपूर्वेस – सागर किराणा
दक्षिणपश्चिमेस – ज्ञानेश्वर मंदिर

गांधीबाग कपडा मार्केट प्रतिबंधित क्षेत्र
उत्तरपश्चिमेस – आहुजा कलेक्शन
उत्तरपूर्वेस – राहुल ट्रान्सपोर्ट
दक्षिणपूर्वेस – गर्ग रोडवेज
दक्षिणपश्चिमेस – युनिक क्रिएशन

Advertisement
Advertisement