Published On : Wed, Apr 15th, 2020

हद्द झाली! नागपुरात मेडिकल मध्ये चक्क ‘मद्य’ विक्री

नागपूर : देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी वैद्यकीय विभागातील प्रत्येक घटकाला तत्पर राहणे आवश्यक आहे. त्यासाठीच वैद्यकीय विभागाचा एक भाग असलेले मेडिकल सुरु ठेवण्यात आले आहे. मात्र नागपुरात याचाही गैरफायदा घेण्यात आला आहे. एका मेडिकल स्टोअर्समधून चक्क दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहिती नुसार मेयो रुग्णालयासमोर कांचन मेडिकल स्टोर्समध्ये नियमबाह्य पद्धतीने बियर आणि इतर मद्य विक्री सुरु होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी घातलेल्या छाप्यात बिसलरी/मिनरल वॉटरच्या बॉक्सेसमध्ये बिअर लपून ठेऊन विक्री सुरु असल्याचे उघड झाले.


पोलिसांनी मेडिकलच्या संचालक निशात गुप्ताला अटक केली तसेच दुकानातून ९० बॉटल्स जप्त केल्या. या मेडिकलच्या संचालकाचा एक नातेवाईक बिअर बार चालवतो. त्याच्याकडून बिअरच्या बॉटल्स आणू त्याची अवैध्यरित्या विक्री सुरु होती. दरम्यान, नागपूर पोलिसांनी आरोपी मेडिकल स्टोअर चालकाला अटक केली असून शहरात अशा पद्धतीने इतर ही मेडिकल स्टोर्समधून मद्य विक्री सुरु आहे कि काय याचा शोध सुरु केला आहे अशी माहिती एबीपीने दिलेल्या वृत्तात आली आहे.